तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या दरांमध्ये होणारी ही वाढ आणखी काही काळासाठी अशीच सुरु राहणार आहे.
20 मार्च 2023 मध्ये सोन्याचे दर थेट 60 हजार रुपयांवर पोहोचले आणि सर्वसामान्यांना घाम फुटला.
1 जून 2012 मध्ये हे दर 30 हजार रुपयांपर्यंत गेले. तर, 2020 मध्ये दरानं 40 हजार रुपयांचा आकडा गाठला.
5 मे 2006 रोजी सोन्याचे दर 10 हजार रुपये इतके होते. 2010 मध्ये हेच दर 20 हजारांवर पोहोचले.
मागील 17 वर्षांमध्ये सोनं थेट 10 हजार रुपये प्रती तोळा इतक्या किमतीवरून 60 हजार रुपयांवर पोहोचलं आहे.
अमेरिका आणि अन्य बँकांमध्ये आलेलं आर्थिक संकट, डॉलरची कमकुवत स्थिती आणि शेअर बाजारांमध्ये असणारी अनिश्चितता या साऱ्याचे परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहेत.