बत्ताशांची माळ

आयुष्यातील गोडव्याचे प्रतिक म्हणून बत्ताशांची माळ लावतात.

कडुलिंब

कडुलिंब हे आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी महत्त्वपुर्ण असते. त्यामुळे यादिवशी कडुलिंबाचे महत्त्व आहे.

रेशमी वस्त्रं

गुढीवर आपण रेशमी मलमलचे आकर्षक रंगाचे वस्त्रं परिधान करतो. तेव्हा गुढीला लावण्यात येणाऱ्या वस्त्रांत विविध रंगं असतात. आपल्या आयुष्यात रंगांचे महत्त्व खूप आहे.

हार

गुढीची पूजा करताना आपण हार गुढीला परिधान करतो. हार हे मांगल्याचे प्रतिक मानले जाते त्यामुळे आपली गुढीही मंगलमय दिसते आणि आपल्यापर्यंतही त्याचे पावित्र्य पोहचते.

कलश

गुढीवर आपण उलट्या कलश ठेवतो जो जमिनीला तोंड करून असतो. याचा अर्थ अशा होतो की जमिनीमार्फत येणारी उर्जा ही आपण वंदन करतो त्या गुढीतून आपल्या कुटुंबाकडे यावी.

VIEW ALL

Read Next Story