भारतात राष्ट्रपतींच्या नंतर उपराष्ट्रपती देशाचे दुसरे नागरिक असतात. ते राज्यसभेचे चेयरमनदेखील असतात
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत. त्यांना किती सॅलरी मिळते जाणून घ्या
2018मध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या बजेटमध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या सॅलरीमध्ये वाढ केल्याची घोषणा केली होती.
बजेटमध्ये उपराष्ट्रपतींची सॅलरी सव्वा लाख रुपयांनी वाढवून चार लाख केली होती. आता भारताच्या उपराष्ट्रपतींची प्रत्येक महिन्याचा पगार चार लाख रुपये आहे.
सॅलरीसोबतच मोफत घर, सिक्युरिटी गार्डसोबतच इतर भत्तेही दिले जातात, मोफत वैद्यकीय सेवा, लँडलाइन कनेक्शन आणि मोबाइल फोनदेखील दिला जातो.
निवृत्तीनंतर उपराष्ट्रपतींना प्रत्येक महिन्याला दीड लाख रुपयांची पेंशन मिळते. त्याचबरोबर त्यांना इतर सुविधाही दिल्या जातात.
राष्ट्रपतींच्या अनुपस्थित उपराष्ट्रपती कार्यवाहक असतात. यावेळी राष्ट्रपतींना मिळणाऱ्या सुविधेचा लाभदेखील ते घेऊ शकतात.