जी 20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) भारतात दाखल झाले. विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. मोदी-बायडेन यांच्यामध्ये पंतप्रधान निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा झाली.

जी 20 शिखर परिषदेसाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील भारतात आल्यात. पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्या द्विपक्षीय चर्चा झाली.

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ या परिषदेसाठी भारतात आले आहे. त्यांचीही पीएम मोदी यांची भेट झाली.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नीसह भारतात दाखल झालेत. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक-योल पत्नीसह भारतात पोहोचले आहेत. जी 20 शिखर परिषदेत ते सहभागी होतील

मिस्त्रचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सीसी भारतात दाखल झाले असून दिल्ली विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.

जी 20 शिखर परिषदेसाठी ओमानचे उपपंतप्रधान ओमान असद बिन तारिक बिन तैमूल अल भारतात आले आहेत.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज जी 20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचलेत. पंतप्रधान मोदींबरोबर त्यांची द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यात आलीय.

कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो दिल्लीत पोहोचले. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा झेवियरही भारतात आलाय.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तईप एर्दोगान भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांची ते भेट घेतील.

जी 20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी संयुक्त अरब अमीरातचे राष्ट्रध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान दिल्लीत दाखल झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story