जी-20 देशांच्या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सपत्नीक भारतात दाखल झाले आहेत. शुक्रवारी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मुर्ती भारतात दाखल झाले.
ऋषी सुनक यांची पत्नी आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांची मुलगी अक्षता मुर्तींच्या ड्रेसने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
अक्षता मुर्ती या ब्रिटनमध्येही त्यांच्या लाइफस्टाइलसाठी आणि फॅशनसाठी ओळखल्या जात असल्याने त्यांच्या या भारत दौऱ्याकडे ब्रिटीश प्रासरामाध्यमांचंही लक्ष आहे.
पतीबरोबर भारतात म्हणजेच माहेरी येताना अक्षता मुर्ती यांनी अँकल लेंथ (घोट्यापर्यंतच्या लांबीचा) फ्लोरल म्हणजे फुलांची डिझाइन असलेला स्कर्ट परिधान केला होता.
अक्षता मुर्ती यांचं नथिंग अंडरनिथ ड्रेस स्टाइलचं व्हाइट शर्ट या फ्लोरल स्कर्टवर फारच सुंदर दिसत होतं.
नथिंग अंडरनिथ ड्रेसमधील हे व्हाइट शर्ट 150 ब्रिटीश पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार 15 हजार 543 रुपयांचं आहे.
अक्षता मुर्ती आणि ऋषी सुनक यांनी काल संध्याकाळी एका संस्थेतील शिक्षक आणि मुलांचीही भेट घेतली.
या मुलांना भेट देण्यासाठी गेलेल्या अक्षता मुर्तींनी गुलाबी रंगाचा मिडी स्कर्ट परिधान केला होता.
अक्षता यांचा हा मिडी स्कर्ट 72 पौंडचा म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे साडेसात हजारांचा आहे.
ऋषी सुनक आणि अक्षता यांचा विमानामधील एक फोटोनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. यात अक्षता आपल्या पतीची टाय नीट करत असल्याचं दिसत आहे.