तुमच्यासोबत मैत्रीत होतोय विश्वासघात? 'ही' चूक करु नका

Aug 04,2023

मैत्री असावी अशी!

मैत्रीमध्ये, तुम्ही कोणाला किती दिवसांपासून ओळखत आहात हे महत्त्वाचं नसतं. तर तुमच्या आयुष्यात येऊन ती व्यक्ती पुन्हा जाणार नाही, हे महत्त्वाचं असतं.

प्राण्याला कधी घाबरु नका, पण एका फसव्या मित्रापासून कायम सावध राहा. कारण प्राण्यापासून झालेली जखम बरी होती पण एका फसव्या मित्राने दिलेली जखमी अनेक वेळा आपलं प्राण घेऊन जाते.

आयुष्यात तुमच्या शत्रूला मित्र बनण्याची हजार संधी द्या पण मित्राला कधीच शत्रू बनण्याची संधी देऊ नका.

खरा मित्र तो असतो जो तुमचा भूतकाळ समजून घेतो, तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही जसे आहात तसे स्विकारतो.

मैत्रीच्या नात्यांमध्ये कधी पैसा येऊ देऊ नका. पैशांमुळे रक्ताची नातीही तुटतात मग मैत्रीचं नातं जपताना या गोष्टीची काळजी घ्या.

कधीही मित्र-मैत्रिणींना इग्नोर करु नका. थोडा वेळ का होईना त्यांना वेळ द्या.

अहंकारामुळे अनेक नात्यांमध्ये फूट पडते. त्यामुळे मैत्रीत शक्यतो अहंकार येऊ देऊ नका.

VIEW ALL

Read Next Story