बिअर प्यायल्याने पोटाचा घेर वाढतो का?

चहा-कॉफीनंतर बिअर हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे. एका रिपोर्टनुसार, भारतात बिअरची दरडोई विक्री 2 लीटर प्रती व्यक्ती प्रती वर्ष आहे.

बिअरसंबंधी अनेक दावे

अनेकजण मोठ्या आवडीने बिअर पित असतात. पण बिअरसंबंधी अनेक दावेही केले जातात.

बिअर प्यायल्याने पोट वाढतं?

एका दाव्यानुसार, बिअर प्यायल्याने पोट वाढतं.

बिअरमध्ये फार कॅलरीज?

बिअरमध्ये फार कॅलरीज असतात, ज्यामुळे त्याचं नियमित सेवन केल्याने फक्त वजन वाढत नाही तर पोटही पुढे येतं असे दावे केले जातात.

'बिअर बेली'

तांत्रिक भाषेत बोलायचं झाल्यास, अशाप्रकारे पोट बाहेर येण्याला 'बिअर बेली' म्हणतात.

बिअरमुळे पोट वाढतं हा दावा पूर्ण खरा नाही

पण बिअरमुळे पोट वाढतं हा दावा पूर्णपणे खरा नाही.

बिअरमध्ये फार कमी कॅलरीज

ऑरेंज ज्यूस, अॅप्पल ज्यूस आणि रेड वाइन किंवा दुधाशी तुलना केली तर बिअरमध्ये फार कमी कॅलरीज असतात.

बिअर पिण्याशी संबंधित प्रक्रिया वजन वाढण्यास कारणीभूत

बिअर पिण्याशी संबंधित एक पूर्ण प्रक्रिया वजन वाढण्यास कारणीभूत ठरते.

बिअरमुळे भूक वाढते

बिअरमुळे भूक वाढते, ज्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात आवडीच्या गोष्टी खातात. यामुळेच पोट वाढतं.

पचन प्रक्रियेत बदल

मेडिकल एक्स्पर्टनुसार, मद्यपान केल्यानंतर आपलं लिव्हर शरीरातील चरबीऐवजी मद्याला पचवण्याचा प्रयत्न करतं. यामुळेही वजन वाढतं.

VIEW ALL

Read Next Story