सध्याच्या घडीला विरोधी बाकावर असणारे नेते अडचणीत दिसत असून, सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईचं अस्त्र उगारलं आहे.
यातलं सध्या चर्चेत असणारं नाव आहे अरविंद केजरीवाल. कधित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी त्यांच्यावर ईडीनं अटकेची कारवाई केली.
आर्थिक अफरातफरीप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना मनी लाँन्ड्रींग प्रकरणी कारावासाची शिक्षा झाली होती.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तुरूंगवासाची शिक्षा झाली होती.
हाय प्रोफाईल आर्थिक घोटाळाप्रकरणी तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांनही तुरुंगवास भोगावा लागला होता.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यार चारा घोटाळाप्रकरणी अटकेची कारवाई झाली होती.