दिवाळीसाठी लाईट खरेदी करताय? या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल पश्चाताप

Diwali 2023: दिवाळी काही दिवसांवर आलीय. सर्व घरांमध्ये दिवाळीची साफसफाई, फराळ आणि खरेदीला सुरुवात झालीय.

नवीन वस्तू, कपड्यांसोबत कंदील, रंगबेरंगी लाईट्सची खरेदीदेखील केली जाते.

दरवर्षी आपल्याला नव्या लाईट्स आणाव्या लागतात. काही लाईट्स तर घरी आणल्या आणल्या बंद पडतात.

काही लाईट्स तुटल्यायत किंवा त्यातून शॉक लागतोय हे घरी आणल्यावर कळतं.

अशावेळी चांगल्या, सुरक्षित आणि दिर्घकाळ टिकणाऱ्या लाईट्स कशा घ्यायच्या? याबद्दल जाणून घेऊया.

स्मार्ट लाइटिंगद्वारे तुम्ही पैसे वाचवू शकता. स्मार्ट लाइट्ससाठी एलईडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्ही लाईट बील वाचवता. नेहमीच्या बल्बच्या तुलनेत एलईडी बल्बचे शेल्फ लाइफ जास्त असते.

दिवे खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही कोणत्या ठिकाणी दिवे लावणार आहात हे ठरवा. कारण जर तुम्हाला पडद्यावर किंवा बाल्कनीत किंवा देवाऱ्ह्यात दिवे लावायचे असतील तर प्रत्येक ठिकाणचे दिवे वेगळे असतील.

झाडे आणि वनस्पतींसाठी स्ट्रीप लाइट सर्वोत्तम आहेत: स्ट्रिप लाइट्स लावणे सोपे आहे. यामुळे वनस्पतींसाठी देखील हानी पोहोचत नाही. हे दिवे सहजपणे बाटल्यांमध्ये ठेवून झाडांवर टांगता येतात.

पडद्यावरील दिव्यांबाबत काळजी घ्या जेव्हा तुम्ही पडदे दिवे खरेदी करता तेव्हा त्यांची गुणवत्ता पाहा.

दिवे जास्त तापणार नाहीत याकडे लक्ष ठेवा. अन्यथा आग लागण्याचा धोका असू शकतो.

VIEW ALL

Read Next Story