अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या इस्रोच्या 'या' प्रमुखांना विसरून चालणार नाही
1963 ते 1971 या कार्यकाळात इस्रोच्या प्रमुखपदी डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई विराजमान होते.
1972 ते 1972 या काळासाठी माम्बिल्लीकालाथिल गोविंद कुमार मेनन अर्थात एमजीके मेनन हे इस्रोच्या प्रमुखपदी होते.
1972 ते 1984 मध्ये प्राध्यापक सतीश धवन यांनी इस्रोच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळली.
1984 ते 1994 या दहा वर्षांच्या काळासाठी उडुपी रामचंद्र राव यांनी इस्रोचं प्रमुखपद भूषवलं.
1994 ते 2003 या काळात डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन हे इस्रोच्या प्रमुखपदी होते.
जी. माधवन नायर यांनी 2003 ते 2009 दरम्यान, इस्त्रोच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती.
2009 ते 2014 या काळात डॉ. कोप्पिल्लिल राधाकृष्ण इस्त्रोच्या प्रमुखपदी कार्यभार सांभाळताना दिसले.
2015 ते 2018 यादरम्यान श्री अलुरू सीलिन किरन कुमार यांनी इस्त्रोच्या प्रमुखपदाजी जबाबदारी सांभाळली.
कैलासावदीवू सिवन हे 2018 ते 2002 या काळात इस्त्रोच्या प्रमुखपदी होते. यादरम्यान चांद्रयान 2 मोहिम त्यांनी सांभाळली होती.
2022 पासून सध्याच्या घडीला इस्त्रोची धुरा एस. सोमनाथ यांच्या हाती आहे.