'या' सवयींमुळे तुम्ही तारुण्यातच म्हतारे दिसता; वेळीच Update व्हा नाहीतर...

अनेकदा आहे त्या वयापेक्षा अधिक वयस्कर दिसण्याची समस्या अनेकांना जाणवते, यावर मात कशी करावी...

अवेळी म्हतारं दिसण्याची समस्या

जितकं वय आहे त्याहून अधिक वय असल्याप्रमाणे अनेकजण अवेळीच वयस्कर वाटू लागतात. अनेकांबद्दल वय होण्याआधीच हा म्हतारे दिसण्याचा प्रकार घडतो.

कायम तरुण दिसावं असा प्रयत्न

आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. वय लपवण्याऐवजी आपल्या त्वचेच्या आणि चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच लूक नुसारही आपण कायम तरुण दिसावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो.

दूर्लक्ष होतं अन्...

मात्र एकीकडे असे प्रयत्न करत असतानाच बऱ्याचदा अशा काही गोष्टींकडे दूर्लक्ष होतं ज्यामुळे अवेळी म्हतारे दिसू लागण्याची समस्या निर्माण होते.

कोणत्या सवयींनी करता येईल मात?

या अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे तारुण वयातही म्हतारं वाटण्याच्या या समस्येवर मात करता येईल? याबद्दल जाणून घेऊयात...

असे कपडे वापरा

नेहमी आपण असे कपडे परिधान करायला हवेत जे तुम्हाला छान वाटतील. उगाच कोणीतरी सांगितलं म्हणून जमत नसतानाही वाटेत ती फॅशन केल्यास आपलं हसू होतं.

हलक्या रंगाचे कपडे

हलक्या किंवा सौम्य रंगाचे कपडे परिधान करण्यास प्राधान्य द्यावं. यामुळे तुम्ही नक्कीच अधिक तरुण वाटता.

स्वत:ला आरशात निरखून पाहा

घरातून बाहेर पडण्याआधी एकदा स्वत:ला आरशात निरखून पाहावे. आपला लूक मनासारखा आहे की नाही हे तपासून बाहेर पडल्यास अधिक आत्मविश्वास वाटतो.

लिपस्टिकची शेड चेक करा

लिपस्टिकची शेडही तपासून पहावी. लिपस्टिक जास्त लागली असेल तर त्यावरुनही आपण छान दिसण्यासाठी अधिक प्रयत्न करत असल्याचं अधोरेखित होतं.

VIEW ALL

Read Next Story