आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये याचा उल्लेख केला आहे.
परस्त्रीकडे पाहू नका. बायकोला हे अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा आपल्या वैवाहिक आयुष्याकडे लक्ष द्या.
पत्नीला काय आवडतं, तिच्या हव्या-नको त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा. याने तिला आनंद होईल.
बायकोशी कधीच खोटं बोलू नका. तुमच्या नात्यात पारदर्शकता असेल तर ते अधिक खुलेल.
दुसऱ्या स्त्रीसोबत पत्नीची तुलना करु नका, हे तिला अजिबात आवडणार नाही.
कितीही राग आला तरी पत्नीचे मन दुखेल असं काही बोलू नका. रा६ क्षणाचा असतो. त्यामुळे तिचं मन जपा.
इतरांसमोरही पत्नीचा अपमान होईल असं काही बोलू नका. तिचा सन्मान करा.
पत्नीमधील कमतरता दुसऱ्या व्यक्तीला सांगू नका. हे पत्नीला समजले तर त्याचे परिणाम वाईट होतील.