बेडवरची मळगट गादी 10 मिनिटात 'अशी' करा स्वच्छ, दमटपणाही जाईल निघून

बेडवरील गादीवर लगेच डाग पडतात. तसेच त्याला दमट वासही येतो. गादी वारंवार धुणे आपल्याला शक्य नसते. अशावेळी काय करायचे हा प्रश्न आपल्याला पडतो.

खूप जास्त खर्च न करता तुम्ही घरच्या घरी बेडवरील गादी स्वच्छ करु शकता.

एका गाळणीत बेकिंग सोडा घ्या आणि तो गादीवर चाळून पसरवा.

10 मिनिटं तो गादीवर तसाच ठेवा. त्यानंतर एक प्लेट घेऊन ती एका कपड्यावर उलटी ठेवा.

कपड्याची चारही टोकं एकत्र करून त्याला रबर बांधा. ही प्लेट इस्त्री प्रमाणे गादीवर फिरवा.

यामुळे गादीवरील बेकिंग सोडा स्वच्छ होईल. यानंतर याच कपड्यावर थोडं पाणी शिंपडा. पुन्हा त्याच पद्धतीने गादीवर फिरवा.

हे करत असताना पंखा चालू असूदे. यामुळे गादी लवकर सुकेल आणि स्वच्छ होईल.

गादीतील दमटपणा आणि वास निघून जाईल. तसेच फंगस इन्फेक्शन, त्वचेची समस्या दूर होईल.

VIEW ALL

Read Next Story