भारत तांदुळ

'भारत तांदुळ' खरेदीवर बंधनं? एकावेळी जास्तीत जास्त किती किलो खरेदी करता येईल?

तांदळाच्या दरांमध्येही तेजी

केंद्राकडून अवघ्या 29 रुपये प्रतिकिलो इतक्या दरानं तांदळाची विक्री करण्यात येत आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाच आता तांदळाच्या दरांमध्येही तेजी आली आहे.

भारत

तांदळाच्या वाढत्या किमतीमुळं देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा फटका बसला आहे. ज्यानंतर आता भारत ब्रँड अंतर्गत केंद्राच्या वतीनं तांदूळ स्वस्त दरात विकला जात आहे.

29 रुपये किलो

अनेक सरकारी भंडार आणि दुकानांवर हा 29 रुपये किलो दरानं मिळणारा तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध आहे.

5 आणि 10 किलोचं पोतं

केंद्र शासनाच्या माहितीनुसार दर कुटुंबाला हा तांदुळ 5 आणि 10 किलोच्या पोत्यांमध्ये मिळणार आहे.

वाढती महागाई

वाढती महागाई पाहता केंद्र शासनानं फक्त तांदुळच नव्हे, तर भारत ब्रँड अंतर्गत यापूर्वी पीठ, डाळीसुद्धा किफायतशीर दरात विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

दिलासा

समाजातील असे घटक जे वाढत्या महागाईमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवेळी आर्थिक आव्हानांचा सामना करतात त्यांच्यासाठी केंद्राची ही योजना मोठा दिलासा ठरत आहे.

VIEW ALL

Read Next Story