बंदूक परवान्याची प्रक्रिया काय आहे?

मॉरिसने घोसाळकरांवर ज्या पिस्तुलमधून गोळीबार केला ते त्याच्या मालकीचं नव्हतं. ते मॉरिसचा बॉडीगार्ड शर्मा यांच्या नावाने परवाना जारी केलेलं पिस्तुल मॉरिसने वापरल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यात शस्त्र परवानाधारक त्यांच्याकडील शस्त्रांचा दुरुपयोग करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पोलीस शस्त्र परवानाधारकांना बोलावून त्यांची चौकशी करणार आहे.

शस्त्र परवाना काढण्यासाठी ठरावीक नमुन्यातील अर्ज भरून तो पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल करावा लागतो. यातील बरेसचे परवाने हे संरक्षणाचे कारण देऊन घेण्यात येतात.

याशिवाय शेतीच्या पिकाच्या संरक्षणासाठीही अग्निशस्त्र परवाना मिळतो. मात्र त्याचे प्रमाण फार कमी आहे.

अग्निशस्त्र परवान्यासाठी रहिवासी पुरावा, फोटो, कोणते अग्निशस्त्र घेणार याची माहिती, दोन व्यक्तींकडून चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्याकीय प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, उत्पन्नाचा दाखला, जन्म प्रमाणपत्र अशी माहिती पोलिसांना द्यावी लागते.

शॉटगन, हँडगन आणि स्पोर्टगन या तीन प्रकारच्या बंदुकासाठी सरकारकडून परवाना मिळतो. अर्जानंतर पोलीस मुख्यालयात प्रक्रिया सुरू होते. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीचा पूर्वइतिहास तपासला जातो. स्थानिक पोलिसांकडून अहवाल मागवला जातो.

त्यानंतर मुंबईत विशेष शाखा तर स्थानिक पातळीवर संबंधित यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. यावेळी अर्ज करणाऱ्याची मुलाखतही घेतली जाते.

पण अधिकारी हे शस्त्र परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांच्या कागदपत्रांसह आणि संबंधित तपासणीवर समाधानी असतील, तरच अर्जदाराला बंदुकीचा परवाना दिला जातो.

हा परवाना 5 वर्षांसाठी दिला जातो. त्यानंतर परवाना सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी 100 रुपये शुल्क भरावे लागते.

VIEW ALL

Read Next Story