नंतर या तिन्ही वेलची एका वाटीत ठेवून कापूरच्या सहाय्याने जाळा. वेलची पूर्णपणे जळाल्यानंतर त्याला तुळशीच्या रोपात टाका.
अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीसमोर 3 वेलची ठेवा. यानंतर शुक्रदेवाच्या नावाचा जप करत त्याची उपासना करा. यावेळी मंत्राचा जपही करा.
यानंतर महालक्ष्मी यंत्र आपलं लॉकर, तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. तुम्हाला आर्थिक समस्या जाणवणार नाही असं बोललं जातं.
एका ताटात केसरच्या सहाय्याने स्वस्तिक तयार करा. त्याच्यावर महालक्ष्मी यंत्र स्थापित करा. तूपाचा दिवा लावा आणि लक्ष्मीच्या नावाचा जप करा.
यानंतर लक्ष्मी आणि विष्णू यांच्याकडे सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा. असं केल्याने तुम्हाला धनाची कमतरता जाणवणार नाही असं म्हटलं जातं.
अक्षय्य तृतीयेला चांदी, तांबं किंवा पितळेचं भांडं घरी आणि त्याच्यात तांदूळ भरुन तिजोरी किंवा धन असणाऱ्या ठिकाणी ठेवा.
आज अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. दरम्यान अक्षय्य तृतीयेच्या रात्री तीन गोष्टी केल्यास लक्ष्मी तुमच्या दरवाजात येत असं बोललं जातं.