सेवानिवृत्ती निधी नियामक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) करोडो ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओकडून यासंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Jan 19,2024


जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) जाहीर केलं आहे. ईपीएफओने जन्मतारीख पुराव्याच्या दस्तऐवज यादीतून आधार कार्ड वगळले आहे.


जन्मतारीख पुरावा म्हणून आधार कार्ड कधीच ओळखले जात नव्हते. डॉक्यूमेटेंशन करताना कोणतीही चूक किंवा गोंधळ होणार नाही याची खात्री करण्यासाठी ईपीएफओने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.


वैध कागदपत्रांच्या यादीतून 'आधार' काढून टाकण्याचा निर्णय भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI च्या निर्देशानंतर घेण्यात आला आहे, असे ईपीएफओने म्हटलं आहे.


युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की आधार हा एक ओळखीचा पुरावा म्हणून काम करतो आणि आधार कायदा, 2016 च्या तरतुदींनुसार जन्मतारखेचा पुरावा म्हणून पात्र ठरत नाही.


यापूर्वी, अनेक ई-केवायसी युजर संस्था आणि आधार प्रमाणीकरण संस्थांनी जन्मतारीख पडताळणीसाठी योग्य कागदपत्र म्हणून आधार कार्ड किंवा सी-आधार स्वीकारले होते.


ईपीएफओच्या या निर्णयाचा परिणाम कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांवर होणार आहे. या निर्णयानंतर ईपीएफओ सदस्यांना जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारकार्डचा वापर करता येणार नाही.


त्यामुळे आधारकार्डला सूचीमधून बाहेर काढल्यानंतर जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्मदाखला, मान्यताप्राप्त शाळेचे गुणपत्रक, शाळा सोडण्याचा दाखला ही कागदपत्रे वापरता येतील.

VIEW ALL

Read Next Story