Ertigaपेक्षा स्वस्त आहे 'ही' 7 सीटर गाडी, फिचर्सची तर मोठी लिस्ट

रेनो ट्रायबर

रेनो ट्रायबर या गाडीत 7 लोक बसू शकतात आणि त्याची किंमत मारुति अर्टिगा पेक्षा कमी आहे.

रेनो ट्रायबरची किंमत

या गाडीची किंमत 6 लाख ते 8.97 लाख रुपये एक्स शोरूम पॅन इंडिया किंमत आहे. तर त्याच जागी जर तुम्ही अर्टिगा घेतली तरी तिची किंमत ही 8.64-13.08 लाख इतकी आहे.

इंजन

या गाडीच्या इंजनविषयी बोलायचं झालं तर 1.0 लीटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजन आहे. जी 72 पीएस पावर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करतं.

मायलेज

रेनो ट्राइबर गाडीचं मायलेज हे 20KM प्रती लीटर आहे. त्याशिवाय हे एआरएआय सर्टिफाइड आहे.

ट्रिम

ट्राइबर चार ट्रिम- आरएक्सई, आएक्सएल, आरएक्सटी आणि आरएक्सजेडमध्ये उपलब्ध आहे. मात्र, त्या सगळ्यांचं इंजयचं ऑप्शन एकच आहे.

गियरबॉक्स

या गाडीच्या गियरबॉक्स विषयी बोलायचं झालं तर त्यात 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स ाणि एएमटी गियरबॉक्सचा ऑप्शन आहे.

फिचर्स

या गाडीत 8 इंचाचं टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, एंड्रायड ऑटो, अॅप्पल कारप्ले, प्रोजेक्टर हेडलॅंप्स, एलईडी टर्न इंडिकेटर्स आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आहेत.

सेफ्टी फीचर्स

या गाडीच्या सेफ्टी फीचर्सविषयी बोलायचे झाले तर 4 एयरबॅग, ईबीडीसोबत एबीएस, रिएर पार्किंग सेंसर आणि रिएर व्यू कॅमेऱ्यासारखे फीचर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story