36 हजारांच्या कपात कॉफी पितो शाहरुख खान, फिचर्स पाहून थक्क व्हाल

शाहरुख खानला उगाच नाही किंग खान म्हणत. शाहरुखच्या लुक्सबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्वाचाही लोकांवर प्रभाव आहे. तुम्हाला माहितीये का शाहरुख खान तब्बल 36 हजारांच्या स्मार्ट मगमध्ये कॉफी पितो. या कपचे फिचर्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

अभिनेता शाहरुख खान EMBER नावाच्या बँडचा स्मार्ट ट्रॅव्हल मगचा वापर करतो.

या मगमध्ये अनेक अॅडव्हान्स फिचर देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यात हीटर आणि LED लायटिंगही देण्यात आली आहे.

शाहरुख खान या स्मार्ट कपसोबतच एका व्हिडिओतही दिसला होता. यात या कपवर शाहरुख खान नाव LED लायटिंगमध्ये दाखवण्यात आलं होतं.

शाहरुख खानकडे असलेल्या या स्मार्ट मगचे नाव Ember Travel Mug2+ असं आहे.

अॅमेझॉनवरही हा कप उपलब्ध असून त्याची किंमत 35950 इतकी आहे.

Ember Travel Mug2+मध्ये लोकेशन शेअर फिचरदेखील आहे.

Apple Find My फिचरदेखील या मगला सपोर्ट करते. अॅपल युजर्स सहज या फिचरमुळं स्मार्ट मग शोधू शकतात.

Ember Travel Mug2+मध्ये टच डिस्प्ले आहे.

यामुळं मगचे फिचर्स कंट्रोल करण्यास मदत होते. या मगचे टेम्परेचर कमी जास्त करण्यासही मदत होते.

Ember Travel Mug2+मध्ये रिचार्जेबल बॅटरी देण्यात आली आहे.

पूर्ण चार्ज केल्यानंतर बॅटरी 3 तासांपर्यंत वापरली जाते. हा मग कारमध्येही चार्ज करता येतो.

Emberचा हा मग अॅपनेदेखील कंट्रोल करता येतो.

Ember Appने हा फोन कनेक्ट करता येतो. त्यामुळं मगवर तुमचे नोटिफिकेशन येतील.

VIEW ALL

Read Next Story