WHOच्या मत, दरवर्षी 80 लाख लोक धुम्रपानाच्या सेवनाने कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे बळी ठरतात.
पण यानंतरही अनेकांचे सिगारेटप्रेम सुटत नाही.
पण तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही धुम्रपान न करताही तुमच्यासोबत कोणी धुम्रपान करत असाल तर तुम्ही कॅन्सरला बळी पडू शकता. याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात
सिगारेटमधून निघणारा धूर हा विषारी असल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. तर पॅसिव्ह स्मोकिंगमुळे स्वादुपिंड, किडनीचे आजार, तोंडाचे आजार अशा समस्या उद्भवू शकतात. याशिवाय घशाच्याही समस्या होऊ शकतात.
सध्या लोकांमध्ये धुम्रपान आणि तंबाबू सेवनाबद्दलची जागृता वाढत आहे. 2000 मध्ये 15 वर्षावरील 32 टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. तर 2020 मध्ये ही संख्या 20 टक्क्यांनी घसरली आहे. याचा सर्वाधिक परिणाम तरूणांवर दिसून येत आहे.
WHOच्या म्हणण्यानुसार दरवर्षी 65 हजारपेक्षा जास्त मुले धुम्रपानाच्या सेवनामुळे आपला जीव गमावतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)