पालकाच्या भाजीत मुबलक प्रमाणात लोह आढळते
पण पालकाची भाजी खायला मुलं कंटाळा करतात.
अशावेळी मुलांना हा पालकचा पौष्टिक पराठा बनवून द्या.
पालक निवडून घ्या. त्यानंतर एका भांड्यात पाणी उकळवून त्यात पालक टाका
त्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस बंद करुन. पालक थंड होण्यासाठी ठेवून द्या
आता पालक, कोथिंबीर, मिरच्या, लसूण, आलं टाकून वाटून घ्या
नंतर एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ, तिखट, जिरे-धणे पूड, हिंग, हळद घेऊन मिक्स करा.
आता पाण्याऐवजी पालकाची प्युरी टाकून चांगले मळून घ्या.
त्यानंतर आता याचे पराठे लाटून घ्या व चांगले तूप लावून भाजून घ्या.