लोकं डॉक्टरांकडे जाण्याचे का टाळतात?

प्रत्येकजण आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जातो जेणेकरून लवकरात लवकर उपचार घेता येतील. पण काही लोकं असे असतात जे डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात. यामागे कोणती कारणे असू शकतात ती लक्षात घ्या.

काही लोकांना कोणता रोग गंभीर आहे आणि त्यांनी कधी डॉक्टरकडे जावे हे माहित नसते.

काही लोकांना पैशांची कमतरता असते. डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी जास्त पैसे खर्च होतात असा त्यांचा समज असतो.

काही लोकांची जीवनशैली खूप व्यस्त असते. त्यामुळे त्यांना डॉक्टरांकडे जायला वेळ मिळत नाही.

काही लोकांना त्यांच्या आजारपणामुळे लाज वाटते.

काही लोकांच्या मनात डॉक्टर आणि उपचारांबाबत गैरसमज असतात.

काही लोक डॉक्टरांपेक्षा पारंपारिक औषधांवर अधिक विश्वास ठेवतात.

VIEW ALL

Read Next Story