चहाला वेळ नसते पण वेळेला चहा पाहिजे, असं म्हटलं जातं. पण काही लोकांनी संध्याकाळी चहाचं नाव सुद्धा काढू नये.
ज्या लोकांना रात्री शांत झोप लागत नाही, त्या लोकांनी संध्याकाळचा चहा बंद करावा.
ज्या लोकांच्या आयुष्यात अनेक टेन्शन असतं. जी लोकं सतत तणावात असतात, अशा लोकांनी संध्याकाळी चहाला हात सुद्धा लावू नये.
कोणाला वजन कमी करायचं असेल तर त्यांनी संध्याकाळचा चहा बंद करावा, काही दिवसातच फरक दिसून येईल.
बदलत्या जीवनशैलीमुळे ज्यांना वेळेवर भूक लागत नाही, अशा लोकांनी संध्याकाळचा चहा बंद केला पाहिजे.
ज्यांना हार्मोनलच्या समस्या होतात, तसेच ज्यांना अॅसिडिटीचा त्रास होता, अशा लोकांनी संध्याकाळी चहा पिऊ नये.
मेटाबॉलिक आणि ऑटोइन्यून यांसारख्या आजारने त्रस्त असलेल्या लोकांनी चहा सोडून दिलेला बरा..