ना सप्तपदी, ना निकाह; सोनाक्षी- जहीर तिसऱ्याच मार्गानं करणार लग्न?

सोनाक्षी सिन्हा

असंख्य चर्चांनुसार अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा प्रियकर जहीर इक्बाल याच्याशी लग्न करणार असून, 23 जून रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

विवाहसोहळा

सुरुवातीला अशा चर्चा होत्या की, सोनाक्षी आणि जहीर कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. पण, आता नव्या माहितीनुसार सोनाक्षी आणि जहीर हिंदू किंवा मुस्लीम अशा कोणत्याच पद्धतीनं लग्न करणार नाहीयेत.

Registered marriage

निकाह किंवा विवाह अशा कोणत्याही पद्धतीनं लग्न करता सोनाक्षी आणि जहीर विवाह नोंदणी कायद्यान्वये असणाऱ्या तरतुदींअंतर्गत एकमेकांचा पती- पत्नी म्हणून स्वीकार करणार आहेत, म्हणजे ते Registered marriage करणार आहेत.

खास पार्टी

23 जून रोजी या जोडीच्या लग्नानिमित्त एक खास पार्टी दिली जाणार आहे. सोनाक्षीच्या मित्रपरिवारातील एकाचा हवाला देत एका वाहिनीनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार लग्नासाठीच्या निमंत्रणामध्ये पार्टीचा उल्लेख असून, कुठेही लग्नातील विधींचा उल्लेख नाही.

ग्रँड सेलिब्रेशन नाही

सूत्रांच्या माहितीनुसार 23 जून रोजी सकाळी ही जोडी रजिस्टर पद्धतीनं लग्न करेल. या लग्नाचं कोणतंही ग्रँड सेलिब्रेशन होणार नसून फक्त लग्नाची पार्टी आयोजित करण्यात आली आहे.

लग्नाचा निर्णय

सलमान खानच्याच पार्टीमध्ये सोनाक्षी आणि जहीर यांची पहिली भेट झाली होती असं सांगितलं जातं. पहिली ओळख, त्यानंतर मैत्री आणि त्यानंतर प्रेमाचं नातं. यानंतर आता या जोडीनं अखेर लग्नाचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

सलमान खानचीही हजेरी

दरम्यान, सध्या सोनाक्षी आणि जहीरच्या या खास दिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तितक्याच खास मंडळींची हजेरी असणार आहे. यामध्ये सलमान खानचीही हजेरी असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

VIEW ALL

Read Next Story