सकाळी उठल्यानंतर 'हे' ड्रायफ्रूट्स खाणं टाळा; होऊ शकतं मोठं नुकसान

Feb 07,2024

आपण रोज ताज्या फळांसह वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्सचं सेवन करतो, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

ड्रायफ्रूट्स कमी प्रमाणात खाल्ले तरी आपल्याला योग्य पोषण आणि एनर्जी मिळते. यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स, फायबर आणि एंटीऑक्सिडेंट्स असतात.

ड्रायफ्रूट्समध्ये ताज्या फळांच्या तुलनेत (वजनाच्या हिशोबाने) साडे तीन पट जास्त फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.

अनेकांना सकाळी ड्रायफ्रूट्स खाण्यास आवडतात. पण काही ड्रायफ्रूट्स सकाळी खाणं टाळलं पाहिजे.

सकाळी खाल्ले जाणारे ड्रायफ्रूट्स

सकाळी रिकाम्यापोटी बदाम, अंजीर, अक्रोड सारखे ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. हे ड्रायफ्रूट्स कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर कमी करण्यात आणि मेंदू तल्लख करण्यात मदत करतात.

बदाम, अक्रोडसारखे ड्रायफ्रूट्स सकाळी खाल्ल्याने त्वचा उजळते आणि हाडं मजबूत होतात.

मनुके सकाळी खाणं टाळा

सकाळी मनुके जास्त खाल्ल्यास भविष्यात डायबेटिज होण्याचा धोका निर्माण होतो.

सकाळी मनुके जास्त खाल्ल्यास दात खराब होण्याचीही भीती असते. मनुक्यांप्रमाणे सकाळी खजूर खाणंही टाळा.

ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत कोणती?

ड्रायफ्रूट्स रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्यांचं सेवन करा. रात्रभर पाण्यात ठेवल्याने त्याच्यातील साखर कमी होते आणि पचनही सहज होतं.

VIEW ALL

Read Next Story