पुरुषांपेक्षा स्त्रियांना काही जीवनसत्त्वांची जास्त गरज असते. कारण त्यांच्या शरीराच्या गरजा वेगळ्या असतात.
मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती दरम्यान महिलांना विशिष्ट जीवनसत्त्वांची जास्त गरज असते.
मासिक पाळीच्या दरम्यान रक्त कमी होऊ नये म्हणून स्त्रियांना अधिक लोह आवश्यक असते.
कॅल्शियम महिलांसाठी विशेषतः गर्भधारणेदरम्यान आणि रजोनिवृत्ती दरम्यान खूप महत्वाचं आहे.
फॉलिक ॲसिड महिलांसाठी अधिक आवश्यक आहे. हे गर्भाच्या योग्य विकासासाठी महत्वाचं असून जन्मजात दोष टाळता येतात.
व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करण्यास आणि कॅल्शियमचे शोषण करण्यास फायदेशीर ठरतात.
चेतासंस्थेच्या योग्य कार्यासाठी आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी 12 ची आवश्यकता असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)