हेअर कलर करणं घातक?

आजकाल फॅशनच्या मागे लागून लोक केसांना वेगवेगळे कलर करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

हेअर कलरिंग प्रोडक्ट्समध्ये पॅराफेनिलेमाइन नावाचे रसायन वापरले जाते. यामुळे अनेकांना त्याचा त्रास होऊ शकतो.

त्वचेची ऍलर्जी

केसांना लावण्यात येणारा रंग हा फक्त तुमच्या केसांवर नाही तर संपूर्ण टाळूवर लावला जातो, ज्यामुळे तुम्हाला त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.

दम्याचा त्रास

दम्याच्या रूग्णांनी केसांच्या रंगाचा अधिक वापर करू नये. त्यामध्ये पर्सलफेट नावाचे रसायन असते जे दम्याच्या रूग्णांसाठी घातक ठरते.

डोळ्यांना हानिकारक

केसांचे रंग तयार करण्यासाठी हानिकारक रसायने वापरली जातात.त्यामुळे केसांचा रंग तुमच्या दृष्टीवर परिणाम करतात.

केस गळणे

हेअर कलरच्या अधिक वापराने केस गळण्याती शक्यता असते.

त्वचेचा कर्करोग

हेअर कलरमध्ये वापरण्यात आलेली रसायने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढवतात.

केसांची वाढ थांबते

हेअर कलरचा अधिक वापर केल्याने केसांची वाढ थांबते आणि यामुळे टक्कल पडणे, केस खराब होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story