ऑलिम्पिक खेळाडुंना मिळणारे मानधन अनेक गोष्टींवर ठरते.
तो खेळाडू कोणत्या देशासाठी खेळतोय, स्पॉन्सरशिप डील्स आणि त्याचे प्रदर्शन या सर्व गोष्टी पाहिल्या जातात.
ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडुंना राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून पैसे मिळतात.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला 37 हजार 500 डॉलर्स इतकी रक्कम मिळते.
रौप्य पदक मिळणाऱ्या खेळाडुला साधारण 22 हजार 500 डॉलर्स इतकी रक्कम मिळते.
कास्य पदक जिंकणाऱ्या खेळाडुंना साधारण 15 हजार डॉलर इतकी रक्कम मिळते.
नीरज चौप्राने 2020 टोक्यो ऑलिम्पिक खेळताना भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकल होतं.
हरियाणा सरकारने त्यांना 6 कोटी रुपये आणि कॅटेगरी 1 ची सरकारी नोकरी दिली आहे.
मनू भाकरदेखील हरिणाची असून तिने नेमबाजीत कास्य पदत मिळवलंय. आता तिला किती रक्कम मिळते? हे लवकरच स्पष्ट होईल.