'या' 9 सवयी तुम्हाला कधीच होऊ देत नाही SLIM!

खूप प्रयत्न करुनही तुमचं वजन कमी होतं नाही, मग नक्कीच तुमचं काहीतरी चुकतंय. तुमच्या वाईट सवयीमुळे तुमचं वजन कधीच कमी होऊ शकतं नाही. तुम्हाला तर नाही ना या सवयी?

चुकीचं ध्येय सेट करणे ही तुमची चूक आहे. तुम्हाला वाटत असेल की 2 दिवसात परिणाम दिसून येतील तर असं होतं नाही, प्रत्येकाच्या वजन आणि शरीरावर वजन कमी होणं अवलबून असतं.

तुम्हाला काटेकोरपणे व्यायाम आणि आहाराचे नियम पाळावे लागेल. तुमची मानसिकता वजन कमी करण्यासाठी घातक ठरु शकते.

अचानक खाणं पिणं सोडल्याने केवळ शरीर कमकुवत होतं, तुमचं वजन कमी होतं नाही. त्यामुळे डाएटिंग करा पण योग्य पद्धतीने करा.

उद्यापासून करु परवापासून करु असं जर तुमच्या स्वभाव असेल तर तुम्ही कधीही वजन कमी करु शकतं नाही.

आज वजन कमी करायचं ठरवलं आणि उद्या वजन कमी झालं असं होत नाही. त्यामुळे वारंवार वजन मोजून निराश होण्यापेक्षा ध्येय प्राप्तीसाठी मेहनत करा.

वजन कमी करण्यासाठी जीममध्ये जाऊन व्यायाम केल्याने फायदा होता. पण जास्त व्यायाम, वेट लिफ्टिंग आणि उच्च तीव्रतेचे व्यायाम करु नका.

वजन कमी करण्यासाठी नियमित राहणं महत्त्वाचं आहे. डाएट आणि व्यायाम यात नियमितता हवी.

वजन कमी करताना शरीरात हायड्रेशन होता कामा नाही. त्यामुळे संतुलित पाणी पिणं आवश्यक आहे. उगाचच जास्त पाणी पिऊन पोट भर नका. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story