भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी धक्कादायक बातमी

दक्षिण आफ्रिकेचा एक वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर झाला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने शुक्रवारी माहिती दिली.

कोण आहे हा खेळाडू?

लुंगी एनगिडी हा दक्षिण आफ्रिकेचा 27 वर्षीय क्रिकेटपटू आहे जो दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो

लुंगी एनगिडीला झाली दुखापत :

क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांनी शुक्रवारी माहिती दिली की, संघाचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी हा डाव्या पायाच्य दुखापतीमुळे संपूर्ण T20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

लुंगी एनगिडी 10 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या दोन T20 सामन्यांमध्ये खेळणार होता, परंतु वैद्यकीय संघ त्याची तपासणी करेल.

सामन्यात खेळनं होणार कठीण :

हा वेगवान गोलंदाज 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही खेळेल की नाही याबाबत शंका आहे.

एनगिडीच्या बदलीची घोषणा

एनगिडीच्या जागी वेगवान गोलंदाज ब्युरन हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.

ब्युरन हेंड्रिक्सचा :

हेंड्रिक्सने जुलै 2021 मध्ये आयर्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 19 टी-20 सामने खेळले आहेत.

VIEW ALL

Read Next Story