कांदे-बटाटे स्वस्त झाले कि आपण घरी जास्त आणून ठेवतो.
भाजी करण्यासाठी काही नसेल तर घरात हमखास बटाटे हा पर्याय असतो.
पण बटाटे व्यवस्थित साठवले नाहित तर त्यांचा ताजेपणा कमी होतो.
अशावेळी बरेच दिवस बटाटे टिकवून ठेवण्यासाठी 'या' आहेत सोप्या टिप्स.
बटाटे थंड, हवेशीर ठिकाणी ठेवा.
बटाटे साठवण्यापूर्वी धुतल्यानं ओलसरपणा तसाच राहतो त्यामुळे ते लवकर खराब होतात.
जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश येणाऱ्या ठिकाणी बटाटे ठेवू नका. कमी थंड आणि अंधार असेल अशा ठिकाणी बटाटे ठेवा.
बटाट्यावरचा हिरवा भाग म्हणजे सोलानिन. यामुळे बटाट्याला कडू चव येते आणि तसे बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्यास आजार होऊ शकतात.
हवेशीर असलेल्या थंड, कोरड्या, गडद ठिकाणी बटाटे साठवल्यास अंकुर कमी येतात.
जर बटाट्यावर अंकुर आले असतील तर बटाटा शिजवण्यापूर्वी ते काढून टाका.