Year Ender 2023: मोठ्या पडद्यानंतर 'या' कलाकारांनी ओटीटीवर केला 'गदर', पाहा यादी

आदित्य रॉय कपूर

आदित्यनं 'द नाइट मॅनेजर' या वेब सीरिजमधून ओटीटीवर डेब्यू केला. ही सीरिज तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. या सीरिजमधील आदित्यच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत.

करीना कपूर

करीनानं 'जाने जान' या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत जयदीप अहलावत आणि विजय वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

शाहिद कपूर

शाहिद कपूरनं 'फर्जी' या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं. ही सीरिज तुम्ही अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

अनिल कपूर

आदित्य रॉय कपूर प्रमाणे अनिल कपूर यांनी देखील 'द नाइट मॅनेजर' या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले. तर अनिल कपूर यांनी या सीरिजमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हानं 'दहाड' या सीरिजच्या मदतीनं ओटीटीवर पदार्पण केलं. यात ती पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसली. तर ही सीरिज तुम्ही अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅट फॉर्मवर पाहू शकता.

दरम्यान, आज ओटीटीचं इतकं क्रेझ आहे की अनेक लोक हे चित्रपट थिएटरमध्ये पाहायला न जाता ओटीटीवर येण्याची प्रतिक्षा करताना दिसतात. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story