6 लक्षणं आणि सवयी ज्या दर्शवतात तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता

Aug 25,2024


जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणे फार महत्त्वाचे आहे. ज्या लोकांमधे आत्मविश्वासाची कमतरता असते त्यांना संकटांना सामोरे जावे लागते .

बसण्याची पध्दत

लोकांच्या नजरेला नजर मिळू नये म्हणून खालच्या बाजूला वाकून बसणे हे स्वतःबद्दलची अनिश्चितता दर्शवते

सततची हलचाल

सतत पाय हलवणे, उगाच वस्तूंशी खेळत बसणे, आदी. कृती अस्वस्थतेतून घडतात. कसलीतरी भीती वाटत असल्यामुळे माणुस सततची हलचाल करतो

आवाजातील उतार

हळू आवाजात बोलणे ,बोलताना अडखळत बोलणे या सवयी आत्मविश्वास कमी करतात

सारखी माफी मागणे

छोट्या-छोट्या गोष्टींसाठी जर तुम्ही सारखी माफी मागत असाल तर तुमच्या मनात भीती आहे

समोरच्याच्या डोळ्यात न बघता बोलणे

समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची भीती वाटणे, बोलताना नजर चोरणे ही आत्मविश्वास नसल्याची लक्षणे आहेत.

नकारात्मकता

आत्मविश्वासाची कमतरता असलेले लोक सकारात्मक विचार करण्याऐवाजी नकारात्मक विचार करतात, स्वतःला बाकीच्यांपेक्षा कमी लेखतात


ही लक्षणे पडताळून बघा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा.

VIEW ALL

Read Next Story