पॅकेट फ्रुट ज्यूसमध्ये अनेकदा साखर आणि प्रिजर्वेटिव्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे असे ज्यूस प्यायल्याने शरीरात साखरेचे प्रमाण वाढते.
पॅकेट फ्रुट ज्यूसमध्ये पोषकतत्वांचा अभाव असतो. या ज्यूसच्या सेवनांमुळे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळाली तरी यानंतर लगेच अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो. तेव्हा नाश्त्यात पॅकेट फ्रुट ज्यूसचे सेवन करू नका.
संत्र, लिंबू या सारख्या फळांचे ज्यूस नाश्त्यात रिकाम्यापोटी करू नये. यामुळे ॲसिडचे प्रमाण वाढू शकते.
विशेषत: जर तुम्हाला ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रिक अल्सरची समस्या असेल तर तुम्ही नाश्त्यासोबत लिंबूवर्गीय फळांचा ज्यूस पिणे टाळावे.
आंब्याचा ज्यूस : आंब्याचा ज्यूस कोणाला आवडत नाही. मात्र नाश्त्यात याचे सेवन करणे नुकसानदायक ठरू शकते. आंब्यात नॅचरल शुगर जास्त असते.
आंब्याचा ज्यूस प्यायल्याने सकाळी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. याशिवाय आंब्याचा ज्यूस फायबरमुक्त असतो, ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटत नाही आणि भूक लवकर वाढते.
डाळिंबाचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु त्याचे सेवन नाश्त्यात करू नये असा सल्ला दिला जातो. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये नैसर्गिक साखर भरपूर असते, ज्यामुळे सकाळी याचे सेवन केल्यास शरीरातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
केळीमध्ये पोटॅशियम आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे नाश्त्यामध्ये केळ्याच्या ज्यूसचे सेवन केल्यास अचानक साखर आणि कॅलरीजचे प्रमाण वाढते.
केळ्याचा ज्यूस खूप लवकर पचतो, ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागते आणि दिवसभर जास्त खाण्याचा धोका वाढतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)