'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना डास जास्त चावतात

पावसाळ्याच्या दिवसात परिसरात अनेकदा घाणीचं साम्राज्य वाढल्याने डासांची पैदास जास्त होते. अनेकदा हे डास चावल्याने डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होतात.

तुम्ही पाहिलं असेल की काही जणांना इतरांच्या तुलनेत जास्त डास चावतात. मात्र असे का होते याबाबत माहिती जाणून घेऊयात.

डास जास्त करून अशा लोकांच्या त्वचेवर बसतात ज्यांच्या शरीराचं तापमान जास्त असतं.

शरीराला येणाऱ्या घामाच्या वासाकडे सुद्धा डास आकर्षित होतात. त्यामुळे जर शरीर स्वच्छ असेल तर डास तुम्हाला चावणार नाहीत.

कार्बन डायऑक्साईडचा वास देखील डासांना आकर्षित करतो. डेंग्यूचे डास त्यांच्या सेंसिंग ऑर्गनने कार्बन डाईऑक्साईडच्या वासाकडे आकर्षित होतात.

वैज्ञानिक रिपोर्ट्सनुसार ज्यांचं ब्लड ग्रुप o असते अशा लोकांकडे डास अधिक आकर्षित होतात आणि चावतात.

बियर पिणाऱ्या व्यक्तींकडेही डास जास्त आकर्षित होतात. कारण बियर पिणाऱ्या लोकांच्या शरीरातून इथेनॉलचा वास येऊ लागतो.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story