या जोड्या बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज; अपकमिंग सिनेमात दिसणार एकत्र

बॉलिवूडमधील अनेक जोड्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो.

त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफीस गाजवलं होतं.

शाहरुख-काजोल, दीपिका-रणबीर,वरुण धवन-श्रद्धा कपूर या जोडींचे चित्रपट म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते.

हे कलाकार आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे,पण यावेळी त्यांचा जोडीदार हा वेगळा असणार आहे.

या चित्रपटांमधून 'या' फ्रेश जोड्या दिसून येणार आहेत.

शाहरुख खान आणि तापसी पन्नू

किंग खानचा 'डंकी' हा नवा चित्रपट येतोय. तापसी पन्नू ही शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना

रणबीर कपुरच्या 'अ‍ॅनिमलची' चर्चा सगळीकडे होतेय, नॅशनल क्रश रश्मीका मंदाना आणि रणबीर कपूर एकत्र दिसणार आहेत. या जोडीचा रोमान्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

वरुण धवन आणि किर्ती सुरेश

कीर्ती सुरेश या साऊथ इंडियन स्टारसोबत वरून धवन 'वीडी 18' या चित्रपटामधून ही नवी जोडी दिसणार आहे.

कार्तिक आर्यन आणि श्रद्धा कपूर

चंदू चॅम्पियन' मधून ही नवी जोडी एकत्र दिसणार आहे. श्रद्धा कपुर आणि कार्तिक आर्यनला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

ह्रतिक रोशन आणि दीपिका पदुकोण

बोल्ड अँड ब्युटीफुल दीपिका पदुकोण आणि बॉलीवूड हँडसम हंक ह्रतिक रोशन ही बिग स्टार जोडी 'फायटर' या चित्रपटातुन एकत्र दिसणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story