बदामाचे तेल

बदामाचे तेल, लिंबाचा रस आणि आवळ्याचा ज्यूस समान पद्धतीने एकत्रित करा. आपल्या केस आणि स्काल्पच्या मिश्रणाने मालीश करा. तीन महिन्यांपर्यंत दिवसातून दोन वेळा हे रुटीन फॉलो करा.

कडी पत्ता

1/4 कप कडी पत्ता आणि 1/2 कप दह्याची पेस्ट करा. ते तुमचे डोके आणि स्काल्पवर लावा. सुमारे 30 मिनिटांनंतर केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करा.

गाजराचा रस

जर केस पांढरे होत असतील तर तुम्ही रोज 250 एमएल गाजराचे ज्यूस प्यायला हवं. यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळेल आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावेल.

कांदा

आठवड्यातून दोन वेळा, हा रस आपल्या डोक्याला लावून घासा. सुमारे 30 मिनिटे केसांवर ही पेस्ट तशीच राहू द्या. नंतर डोकं शॅम्पूने धुवून घ्या. पांढ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे.

व्हीटग्रास जूस

1 मोठा चमचा व्हीटग्रास पावडर रोज आपल्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणात मिक्स करा. यामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे केसांना हेल्दी वाढ मिळते आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंद होण्यास मदत करते.

राजगिरा

ताज्या राजगिराचा रस काढा आणि आठवड्यातून तीन वेळा केसांवर लावा. आयुर्वेदामध्ये हे एक अतिशय प्रभावी आणि अंमलात आणला गेलेला उपाय मानला जातो.

तूप

देशी गाईच्या शुद्ध तुपाने केस आणि स्काल्पला मसाज करा. यामध्ये असलेले प्रोटिन केसांना जबरदस्त पोषण देते आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंद करते.

काळ्या तिळाचे बी

आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा, एक चमचा काळ्या तिळाच्या बीचे सेवन करा. याच्या सेवनाने केस पांढरे होण्याची प्रक्रिया केवळ मंदच होते, असे नव्हे तर अनेवेळा पोषण मिळाल्यामुळे पांढरे केसही काळे होऊ लागतात.

आवळा

दररोज ताज्या आवळ्याचा ज्यूस प्या. जर असे करणे शक्य नसेल तर प्रत्येक आठवड्याला एकदा आवळ्याच्या तेलाने केसांची मालीश करा. आवळा केसांसाठी संजीवनीचे रुप मानले जाते.

खोबरेल तेल

प्रत्येक दुसऱ्या दिवशी, झोपायला जाण्यापूर्वी आपले केस आणि डोक्याच्या त्वचेला खोबरेल तेलाने मालीश करा. सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे आपले केस धुवून घ्या.

VIEW ALL

Read Next Story