तुम्हाला हे माहितीये का?

कमनीय बांधा, मादक अदा; सौंदर्याची खाण असूनही 'या' तरुणीकडे जग वेगळ्या नजरेतून का पाहतं?

आपण स्वत:ला ओळखू लागतो

आपण, जन्माला येतो त्या क्षणापासून कधीच Pefect नसतो. मुळात जसजसे मोठे होतो तसतसं आपण स्वत:ला ओळखू लागतो.

yulianna yussef

yulianna yussef च्या बाबतीतही तेच झालं. तुम्ही जन्मखुणेविषयी ऐकलंच असेल. कोणाच्या चेहऱ्यावर तर कोणाच्या शरीराच्या विविध भागांवर या जन्मखुणा असतात.

जन्मखुणेचा हेवा?

प्रत्येकालाच या जन्मखुणेचा हेवा वाटतो असं नाही. तर, काही मंडळींना त्यामुळं अवहेलनेचाही सामना करावा लागतो. yulianna yussef नं याचसंदर्भातील तिचा विचार जगापुढे मांडला आहे.

युलियाना

पोलंडमधील वारसॉ येथे राहणारी युलियाना सध्या चर्चेचा विषय ठरतेय ती म्हणजे तिच्या शरीरावर असणाऱ्या जन्मखुणांमुळे.

जन्मखुणा

तिच्या शरीरावर एकदोन नव्हे तर बरेच करड्या रंगाचे चट्टे आहेत. या तिच्या जन्मखुणा आहेत.

शरीरावर खुणा

युलियानाच्या पाठीचा बहुतांश भाग याच खुणांनी व्यापला आहे. तिच्याच माहितीनुसार साधारण 2000 जन्मखुणा शरीराच्या विविध भागांवर आहेत.

अडचणींचा सामना

लहानपणापासून तिला यामुळं बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. काही पालक तर त्यांच्या मुलांना तिच्यासोबत खेळूही देत नव्हते.

संसर्गजन्य आजार?

हा कोणतातरी संसर्गजन्य आजार असून, तो आपल्याही मुलांना होईल अशी भीती त्यांना वाटत होती. मुळात यात त्यांचा नव्हे, तर त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवणाऱ्या समाजाचा दोष होता.

दुर्धर शारीरिक व्याधी

युलियानाला 'कंजेनिटल मेलानोसाइटिक नेवस' ही एक दुर्धर शारीरिक व्याधी आहे. ब्राऊन बर्थमार्क म्हणूनही हा प्रकार ओळखला जातो. पण, वाढत्या वयासोबत तिनं ही स्थितीसुद्धा स्वीकारली आणि आज त्यावर मात करून ती मनमुराद आनंद जगत आहे. इतरांनाही मनसोक्त जगण्याचा संदेश देत आहे. (सर्व छायाचित्र - yulianna yussef instagram)

VIEW ALL

Read Next Story