Jio चा भन्नाट प्लॅन! Unlimited डेटाबरोबरच 16 OTT चं Subscription Free

या प्लॅन्सच्या पेमेंटचे दोन पर्याय ग्राहाकांसाठी उपलब्ध आहेत, पाहूयात सविस्तर माहिती...

Swapnil Ghangale
Jun 09,2023

जीओ फायबर सेवा

जीओने देशभरातील अनेक शहरांमध्ये आपली फायबर सेवा म्हणजेच ब्रॉडबॅण्ड सेवा सुरु केली आहे.

गावांमध्येही सेवा

जीओची ही सेवा अनेक शहरांबरोबरच वेगवेगळ्या गावांमध्येही उपलब्ध करुन दिली जात आहे.

पोस्टपेड आणि प्रीपेडची सेवा

जीओच्या फायबरचे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजेच यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत.

आधी पैसे द्या किंवा नंतर

म्हणजेच जीओ फायबरचं कनेक्शन घ्यायचं असेल तर प्रीपेड अर्थात आधी पैसे भरुन सेवा घेण्याचा पर्याय निवडता येईल किंवा पोस्टपेड म्हणजेच नंतर पैसे भरण्याचा पर्यायही निवडता येईल.

अनलिमिटेड टेडा

जीओने 999 रुपयांमध्ये जिओ फायबरचे प्लॅन्स उपलब्ध करुन दिले आहेत. यामध्ये युझर्सला अनलिमिटेड टेडा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसचं सबस्क्रिप्शनही दिलं जात आहे.

व्हॅलिडीटी 30 दिवसांची

जीओ फायबरच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. यामध्ये 150 एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये मोफत व्हॉइस कॉलचीही सेवा देण्यात आली आहे.

16 प्लॅटफॉर्मसचा समावेश

या रिचार्ज प्लॅनमध्ये युझर्सला 16 OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. यात Amazon Prime Video, Disney Plus Hotstar, Voot Select, Zee5, Sony Liv सहीत एकूण 16 प्लॅटफॉर्मसचा समावेश असेल.

Amazon Prime Video चं सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी

जीओच्या प्लॅनमध्ये मोफत मिळणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी Amazon Prime Video चं सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत मिळणार आहे. मात्र 999 एमआरपीवर जीएसटीची रक्कम अतिरिक्त भरावी लागणार आहे.

399 रुपयांचा प्लॅन

जीओ फायबरच्या प्रीपेड प्लॅन्सची सुरुवात 399 रुपयांपासून होते. या प्लॅनमध्ये युझर्सला 30 एमबीपीएसच्या वेगाने अनलिमिटेड डेटा मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची असेल.

699 रुपयांचा प्लॅन

तर 100 एमबीपीएसचा वेग असलेला हा प्लॅन 699 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये युझर्सला 30 दिवसांचा अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. मात्र या दोन्ही प्रीपेड प्लॅनमध्ये ओटीटीच्या सेवांचा समावेश नाही.

VIEW ALL

Read Next Story