सेलिब्रिटींच्या घरी बऱ्याच कार्यक्रमांना ज्या शेफचं Healthy Food जातं त्याच चिनू वझेनं सोशल मीडियावरून वजन कमी करण्यासाठी उपासमार न करता आरोग्यवर्धक आहार कसा घ्यायचा याबाबतच्या काही टीप्स दिल्या आहेत.
चिनू वझे आणि आलियाचं खास नातं. कारण, आलियालाही तिचं जेवण विशेष आवडतं. आरोग्यास पूरक असणाऱ्या घटकांचा दैनंदिन आहारात समावेश करून सुरेख पदार्थ तयार करण्यासाठीच चिनू ओळखली जाते.
अशा या चिनूनं नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही Tips सर्वांसोबत शेअर केल्या. जिथं तिनं चांगलंचुंगलं खात वजन नियंत्रणात ठेवण्याचं मार्गदर्शन स्वानुभवातून केलं.
सुरुवात ब्रेकफास्टनंच करायची झाल्यास दिवसाच्या सुरुवातीलाच आहारात कार्बोहायड्रेट्स नसणारे पदार्थ खाण्यावर भर द्या. यामध्ये प्रोटीन, Good Fats असणं कधीही उत्तम.
चपाती किंवा भात आणि आहारातील इतर पदार्थांच्या सेवनापूर्वी तुमच्या पानात वाढलेली कोणतीही भाजी सर्वप्रथम खाऊन घ्या. यामध्ये कडधान्य असल्यास अगदी उत्तम. या सवयीमुळं तुम्ही आहाराचं अतीसेवन टाळता.
आहारातील उणिवा भरून काढण्यावर कायमच भर द्या. ज्यावेळी आपण आहातातून भात किंवा पोळी गाळतो त्यावेळी तंतूमय पदार्थ अर्थात Fiber Rich Food ला प्राधान्य द्या.
आहारामध्ये फळं, अंडी, मांस, मासे यासोबतच डाळी, दही, कडधान्यांचाही समावेश करा. भात किंवा पोळीऐवजी भाकरी खाण्याला प्राधान्य द्या.
शाकाहारी पदार्थांमध्ये वरून तूप घेतल्यास जेवण रुचकरही लागेल आणि तुपाचा शरीराला फायदाही होईल. तुपाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या पोटावरील चरबीही कमी होण्यास मदत होईल.
आहाराचं नियोजन करत असताना त्याच्या प्रमाणावर लक्ष देण्याऐवजी त्यातील घटकांच्या संतुलनावर भर द्या. शरीराला आवश्यक ती सर्व पोषक तत्त्वं पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहा आणि पोटभर खाऊन वजन कमी करा.