नेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा

नेलपॉलिश लावल्याने हाताचे सौंदर्य वाढते पण तुम्हाला माहित आहे का यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

नेलपॉलिश लावल्याने नखे कमकुवत होतात आणि नख तुटल्याने नखांची नैसर्गिक चमक कमी होते.

नेलपॉलिशमध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात.या रसायनांनमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.नेलपॉलिशच्या अतिवापरामुळे तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.

नेलपॉलिशमध्ये वापरलेल्या रसायनांमुळे पचनसंस्थेमध्ये अडथळे निर्माण होतात.यामुळे अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.

नेलपेंटमध्ये टोल्युइन नावाचे रसायन वापरले जाते. हे रसायन आपल्या नखांमध्ये आणि इतर पेशींमध्ये संपर्क निर्माण करतात.

जर नेलपेंटमध्ये असलेले टोल्युइन रसायन तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात पोहचले तर महिलांना लिवर आणि किडनीचा त्रास होऊ शकतो.

तसेच नेलपेंटमध्ये असलेले टोल्युइन स्तनपान करणाऱ्या महिलांकडून मुलापर्यंत गेले तर मुलाची वाढ खुंटू शकते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story