Mosquito Bite Remedies: मच्छर चावल्यानंतर होणारी जळजळ आणि सूज घालवण्यासाठी घरगुती उपाय !

मच्छर चावल्यानं होतो त्रास

पावसाळ्यात मच्छर चावण्याच्या समस्येनं सगळेच त्रस असतात. त्यावेळी काय करायला हवं हे कळत नाही. काही घरगुती उपाय जाणून घेऊया...

आइस पॅक

मच्छर चावल्यानं सूज येते आणि त्रास होतो. ते कमी करण्यासाठी तुम्ही आइस पॅकनं ती जागा शेकू शकता. त्यानं सूज कमी होईल. कॉटनच्या कपड्यात बर्फ घ्या आणि मग मच्छर चावत असलेल्या जागी काही मिनिट ठेवा. (Photo Credit : istock)

अॅपल साइडर विनेगर

एका कॉटन बॉलवर अॅपल साइडर विनेगर घ्या आणि मच्छर चावलेल्या जागी ठेवा. त्यात असलेली अॅसिडिटी ही खाज कमी करण्यास मदत करेल.

कसं साफ कराल अॅपल साइडर विनेगर?

अॅपल साइडर विनेगर मच्छर चावलेल्या जागी लावल्यानंतर तिथे जरावेळ राहु द्या आणि नंतर टॅप वॉटरनं धून काढा.

कोरफड

कोरफड हे आपल्या सुंदरतेसाठी जितकं चांगल असतं त्याच प्रमाणे जेव्हा आपल्याला कधी जळजळ होत असेल किंवा भाजलं तरी बरेच लोक कोरफड लावतात. अशात मच्छर चावलेल्या ठिकाणी देखील तुम्ही कोरफड लावू शकता.

कोरफड लावण्याची पद्धत

कोरफडमध्ये असलेलं जेल काढा आणि मच्छर चावलेल्या ठिकाणी लावा आणि मग 10-15 मिनिट ठेवा. त्यानंतर पाण्यानं धुवून काढा.

बेकिंग सोडा

मच्छर चावलेल्या ठिकाणी तुम्ही बेकिंग सोडा देखील लावू शकता. बेकिंग पावडर आणि त्यात थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्या. त्या पेस्टला मच्छर चावलेल्या ठिकाणी लावा आणि 10-15 मिनिटांनंतर पाण्यानं धुवून काढा. त्यानं खाज आणि सूज दोन्ही कमी होईल.

मध

मधात एन्टी बॅक्टेरियरल गुणधर्म आहेत हे आपल्याला माहित आहे. त्यामुळेच मच्छर चावलेल्या ठिकाणी मध लावा. हे देखील 10 ते 15 मिनिटं ठेवा आणि मग धुवून काढा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story