बटाट्याचा रस तुमच्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. बटाटा किसून त्याचा रस काढा आणि 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नॉर्मल पाण्यानं चेहरा धूवून काढा. आठवड्यातून तीन वेळा हे नक्कीच करा.
कोरफड ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्याने पावसाळ्यात त्वचेच्या विविध समस्यांपासून आराम मिळू शकतो.
पावसाळ्यात चेहऱ्यावर चंदन पावडर लावणे फायदेशीर मानले जाते. तुम्ही चंदनाचा पॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि टॅनिंगही कमी होते.
त्वचेतील डेड स्किन काढून टाकण्यासाठी आणि छिद्र बंद करण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा तुमची त्वचा एक्सफोलिएट करा.
चेहऱ्यावर असलेली घाण आणि तेलकट पणा घालवण्यासाठी दिवसातून दोन ते तीनवेळा चेहरा क्लीन्सरनं धूवा.
पावसाळ्यात आर्द्रता असली तरीही, तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण टाळू नका. अशा परिस्थितीत त्वचा हायड्रेटेड असणं महत्त्वाचं असतं.
ढगाळ वातावरणामुळे सूर्य दिसत नसला तरी देखील आपणं टॅन होतो. त्यामुळे याकाळात कमीत कमी SPF 30 असलेली सनस्क्रीन लावा.
पाऊस किंवा आर्द्रतेमुळे होणारा परिणाम टाळण्यासाठी वॉटरप्रूफ मेकअप वापरा.
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे तुमच्या त्वचेचा प्रकार समजून घेणे आणि त्यानुसार स्किनकेअर उत्पादने निवडणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून सल्ला घ्या. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)