पावसाळ्यात हेडफोन्स खराब होण्याची भिती; हा जुगाड एकदा करुन बघाच

पावसाच्या दिवसात घराबाहेर पडताना मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण पाण्यामुळं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लगेचच खराब होऊ शकतात. हेडफोन आणि इअरबड्स आपल्या कानातच असतात. अशावेळी जोराचा पाऊस आल्यास ते भिजून खराब होण्याची शक्यता असते

तुम्हीदेखील हेडफोन लावून घराबाहेर पडत असाल तर आज या टिप्स नक्की वाचा. या टिप्समुळं तुम्ही पावसाळ्यातही हेडफोन्स सुरक्षित ठेवू शकता

पावसाच्या पाण्यापासून हेडफोन्स वाचवण्यासाठी चांगल्या प्रतीचे सिलिकॉन कव्हर खरेदी करा. सिलिकॉन कव्हरमुळं संरक्षण मिळते.

सिलिकॉन कव्हर ऑफलाइन किंवा ऑनलाइन मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतील

तुम्ही हेडफोनसाठी वॉटरप्रुफ केसदेखील खरेदी करु शकता. पण तर तुम्ही ईअरबड्स खरेदी करत असाल तर त्याआधी आयपी रेटिंग तपासा

तुम्ही टॅबलेट घेऊन जात असताना अचानक पाऊस आला तर ते खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी वॉटरप्रुफ कव्हर घ्या

टॅबलेटसाठी कव्हर खरेदी करत असताना एक गोष्ट ध्यान्यात घ्या ती म्हणजे कव्हर चार्जिंग पोर्ट आणि हेडफोन जॅकदेखील सुरक्षित राहिल.

कारण अनेकदा पावसाचे पाणी पोर्टच्या आतदेखील जाते त्यामुळं टॅबलेट खराब होण्याची शक्यता जास्त असते

इतकी सगळी काळजी घेऊनही तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स खराब होतात तर जोपर्यंत ते पूर्णपणे कोरडे होत नाही तोपर्यंत सुरु करु नका

कारण गॅजेट्समध्ये पाणी असेल तर डिव्हाइसमधील इंटरनल पार्टमध्ये शॉर्ट सर्किटहोऊ शकते. ज्यामुळं गॅजेट्स बंद पडतात.

VIEW ALL

Read Next Story