मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एशियन गेम्स 2023 मध्ये खेळणार आहे.
टीम इंडिया पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये खेळणार आहे. याआधी 2010 आणि 2014 मध्ये बीसीसीआयने टीम इंडियाला पाठवलं नव्हतं.
28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल, यात एशियातले 18 संघ सहभागी होतील.
1 जून 2023 पर्यंत टॉप4 पर्यंत टॉपवर असलेला संघ थेट क्वार्टर फायनल खेळेल. आणि नियमानुसार टीम इंडिया सध्या रँकिंगमध्ये टॉपवर आहे.
एशियन गेम्समध्ये 2010 बांगलादेशने तर 2014 मध्ये श्रीलंकेने गोल्ड मेडल पटकावलं होतं. तर दोन्ही वेळा अफगाणिस्तानने सिल्व्हर मेडल जिंकल होतं.
तर 2010 मध्ये पाकिस्तानने आणि 2014 मध्ये बांगलादेशने ब्राँझ मेडल पटकावलं होतं. एशियन गेम्समध्ये नॉकाऊट सामने खेळवले जातात
टीम इंडिया थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला गोल्ड मेडल पटकावण्यासाठी केवळ तीन सामने खेळावे लागणार आहे.
सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना होऊ शकतो. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने युवा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे.
अनेक खेळाडूंना पहिल्यांदाच टीम इंडियात जागा देण्यात आली आहे. यात जितेश शर्मापासून प्रभसिमरन सिंहपर्यंतचा समावेश आहे.
एशियन गेम्सच्या महिला विभागात पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने 2 गोल्ड मेडल जिंकली आहेत.