दातांमध्ये ठणके मारत असतील तर किचनमधले 4 पदार्थ येतील उपयोगी
Pravin Dabholkar
Aug 21,2023
दातांमधील सेंसेटिव्हिटीमुळे लोकांना अनेकदा त्रास होतो. आपले दात खूप थंड आणि गरम वाटू लागतात.यामुळे खाणे-पिणेही कठीण होते.
पण काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास दातांची ही संवेदनशीलता कमी होण्यास मदत होऊ शकते.
विशेष म्हणजे यातील बहुतांश गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच मिळतील.
नारळाच्या तेलाने गुरळ्या करा. नारळाचे तेल दातांमधील बॅक्टेरियाचे संक्रमण कमी करते. यामुळे दात मजबूत होतात आणि त्यांचा पोत सुधारतो.
यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे दाह कमी करण्यास आणि दात मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे दिवसातून दोनदा ग्रीन टीच्या पाण्याने गुरळ्या करा.
मध बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा करुन तोंडातील चांगल्या बॅक्टेरियाला प्रोत्साहन देते. त्यामुळे कोमट पाणी आणि मधाने दिवसातून दोनदा गुरळ्या करा.
वेदना कमी करण्यासाठी तुम्ही दुखाऱ्या दातांवर हळद चोळू शकता. मोहरीचे तेल आणि मीठ वापरून पेस्ट बनवा. ही पेस्ट दिवसातून दोनदा हिरड्या आणि दातांवर लावल्याने वेदना कमी होतात.