श्रावण महिन्यात अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. श्रावणातील सण आणि शनिवार -सोमवारी उपवास करतात. अशावेळी वेगवेगळे काय पदार्थ करायचे असा प्रश्न पडतो.
श्रावणात उपवासाचे तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करु शकता. घरात असलेल्या साहित्यांमधूनही तुम्ही हा एक चटपटीत पदार्थ बनवू शकता. साहित्य आणि कृती जाणून घ्या.
तीन बटाटे, हिरवी मिरची वाटून घेतलेली, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस, शिंगाडा पीठ, भगरीचे पीठ, तेल
सर्वप्रथम सर्व बटाटे उकडून घ्या, त्यानंतर बटाटे हाताने छान कुस्करुन घ्या.
बटाटे बारीक झाल्यानंतर त्यात जीरे पूड, बारीक केलेली हिरवी मिरची, लिंबाचा रस हे सर्व पदार्थ टाकून मिश्रण एकजीव करुन घ्या.
मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे वडे बनवून घ्यावे.
बॅटरसाठी भगरीचे पीठ आणि शिंगाड्याचे पीठ एकत्र करुन त्यात चवीनुसार मीठ घालावे व पाणी घालून वड्याचे बॅटर तयार करुन घ्यावे.
या बॅटरमध्ये तळलेले वडे घोळवून तळून घ्यावे. बटाट्याचा रंग बदलला की तो काढून घ्यावा.