चहा बनवून झाल्यानंतर चहाची पावडर फेकून दिली जाते. तुम्हीदेखील असं करत असाल तर थांबा
चहा बनवून झाल्यानंतर उरलेल्या चहापावडरचा वापर तुम्ही किचनमध्ये करु शकता. त्याचबरोबर सौंदर्यासाठीही त्याचा वापर केला जाऊ शकतो
उरलेल्या चहाच्या पावडरचा वापर तुम्ही छोले बनवण्यासाठी करु शकता. छोले उकडवताना त्यात चिमूटभर चहाची पावडर टाका. त्यामुळं रंग आणि चव दोन्ही छान येईल.
उरलेल्या चहाची पावडर तुम्ही खत म्हणूनही वापरु शकता. झाडांना चहा पावडरचे खत करुन घातल्यानंतर झाडांचे आरोग्य सुधारते
चहामध्ये अँटी-ऑक्सिंडट हे गुण असतात. एखादी जखम अथवा झाल्यास त्यावर चहापावडरीचा लेप लावल्यास रक्तस्त्राव बंद होतो.
उरलेल्या चहा पावडरीमध्ये थोडीशी विम पावडर मिसळून क्रोकरी साफ केल्यास त्यांना चमक येते
वापरलेले टी बॅग्स थंड झाल्यानंतर त्यातील पाणी काढून 10 मिनिटांसाठी डोळ्यांखाली ठेवा. त्यामुळं डार्क सर्कल कमी होतील.
चहा पावडर उकळलेल्या पाण्यात टाकून ते पाणी शॅम्पूनंतर केसांना लावून केस धुवून घ्या
उरलेली चहा पावडर पुन्हा एका पाण्यात टाकून उकळवून घ्या. त्यानंतर एका स्प्रे बॉटलमधून भरुन त्या पाण्याने आरसा साफ करुन घ्या