प्राजक्ताचं लग्न का होत नाही? स्वत:च सांगितलं सिंगल असण्याचं कारण!

Aug 09,2023

प्राजक्ता माळी

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखली जाते.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावण्याचं काम प्राजक्ता माळीने केलंय. त्यामुळे त्याच्या फॉलोवर्सची संख्या दिवसेंदिवस वाढच चाललीये.

प्राजक्ता लग्न करणार तरी कधी? हा प्रश्न कायमच विचारण्यात जातो. त्यावर आता खुद्द प्राजक्ताने उत्तर दिलंय.

माझ्या लग्नाविषयी लोक प्रत्येकवर्षी बोलतात. 2018 पासून हे सुरू आहे. या वर्षी, मग पुढच्या वर्षी असं चालूच असतं, असं प्राजक्ता म्हणते.

अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राची इच्छा आहे की मी लग्न करू नये, असंही प्राजक्ता म्हणते.

अर्धी लोकं माझ्या लग्नाची वाट बघतायत आणि अर्धे नाही व्हायला पाहिजे असं म्हणतात. त्यामुळेच माझं लग्न होत नाहीये, असं प्राजक्ता म्हणते.

दरम्यान, कर्जत येथे डोंगराच्या कुशीत नुकताच प्राजक्ताने फार्म हाऊस घेतला होता. त्याचे फोटो तिने शेअर केले होते.

VIEW ALL

Read Next Story