पावसाळ्यात आवर्जून दिसणारी ही हिरव्या रंगाचे आणि लांबून काटेरी वाटणारी भाजी फारच पोषक आहे. जाणून घेऊयात तिचे फायदे...
पावसाळ्यात मिळणाऱ्या सिझनल भाज्यांच्या यादीत कंटोळ्याच्या भाजीचं नाव आवर्जून घेतलं जातं. बाजारात ही भाजी पावसाळ्याच्या सिझनमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.
कंटोळ्याच्या भाजीमध्ये अनेक पोषक तत्वं असतात. ही तत्वं कोणती आणि कंटोळ्याची भाजी खाण्याचे फायदे जाणून घेऊयात...
पावसाळ्यामध्ये कंटोळ्याची भाजी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे संसर्गाचा धोका कामी होतो.
कंटोळ्याची भाजीचं सेवन केल्याने व्हायरल फिवरबरोबरच इतर आजारांचा संसर्गही होत नाही.
कंटोळ्याची भाजी सर्दी, खोकला आणि घशातील खवखव यासारख्या समस्यांवरही रामबाण उपाय ठरते.
कंटोळ्याच्या भाजीचा फायदा शरीरामधील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही होतो. या भाजीत फायबरचं प्रमाण अधिक असतं.
कंटोळ्यामधील अतिरिक्त फायबरमुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
कंटोळ्याची भाजीमुळे पचनक्रियाही सुधारते. यामधील फायबरमुळे पचनक्रिया अधिक सुरळीत होते.
रक्तदाबाचा त्रास असलेल्यांसाठी कंटोळ्याची भाजी फायद्याची ठरते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
कंटोळ्याच्या भाजीतील ल्यूटिनमुळे हृदयासंदर्भातील समस्या दूर ठेवण्यास मदत होते. या भाजीमध्ये व्हिटॅमीन सी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते.
वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांनी कंटोळ्याची भाजी आवर्जून खावी. यात कमी कॅलरीज असतात. या फायबरयुक्त भाजीमुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहतं.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.